पायरोग्राफीद्वारे साकारली शिवरायांची प्रतिकृती
यवतमाळ,
Pyrography artwork of Chhatrapati Shivaji Maharaj भारतीय संस्कृतीचा अभिमान वाढवणारी कामगिरी करत ओवी आशिष गावंडे हिने आपल्या उत्कृष्ट पायरोग्राफी कलेद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सध्या अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्युस्टन येथे वास्तव्यास असलेल्या ओवीने छत्रपती शिवाजी महाराजांची पायरोग्राफी कलाकृती साकारली.
ही विशेष कलाकृती महाराष्ट्र दिन व गुजरात दिनानिमित्त 8 मे रोजी आयोजित कार्यक्रमात भारतीय वाणिज्य दूतावास, ह्युस्टन येथे प्रदर्शित करण्यात आली. कार्यक्रमात भारताचे कॉन्सुल जनरल डीसी मंजुनाथ यांच्या उपस्थितीत ओवीच्या कलाकृतीचे विशेष कौतुक करण्यात आले. पायरोग्राफी ही लाकडावर जाळून कलाकृती निर्माण करण्याची एक अनोखी कला असून, एवढ्या कमी वयात ओवीने या कलेत दाखवलेले प्रभुत्व उल्लेखनीय आहे. तिच्या या यशामुळे गावंडे परिवारासह भारतीय समुदायामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Pyrography artwork of Chhatrapati Shivaji Maharaj तरुण कलाकारांना प्रोत्साहन देणाèया या उपक्रमामुळे ओवीसारख्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर आपली कला सादर करण्याची प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. ओवी ही पुसद येथील ज्येष्ठ विधिज्ञ माधव माने व वृषाली माने यांची नात आहे. ओवी आशिष गावंडेच्या या आगळ्यावेगळ्या यशाबद्दल विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.