जयपूर,
Rashids new feat in IPL राशीद खान याने आयपीएल २०२६ मध्ये पुन्हा एकदा आपल्या फिरकीची जादू दाखवत राजस्थानविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सला दमदार विजय मिळवून दिला. जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानावर झालेल्या या सामन्यात त्याच्या भेदक गोलंदाजीसमोर राजस्थानच्या फलंदाजांनी अक्षरशः शरणागती पत्करली. गुजरातने प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारल्यानंतर रशीदने आपल्या अचूक आणि वेगवेगळ्या फिरकीच्या चेंडूंनी सामना पूर्णपणे आपल्या बाजूने फिरवला.
चार षटकांच्या गोलंदाजीत त्याने ३३ धावा देत चार महत्त्वाचे बळी घेतले. त्याच्या गोलंदाजीमुळे राजस्थानचा डाव कोसळला आणि गुजरातने तब्बल ७७ धावांनी विजय मिळवला. Rashids new feat in IPL या शानदार कामगिरीमुळे राशीद खानने आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा तीन किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेणाऱ्या फिरकी गोलंदाजांच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. या सामन्यानंतर त्याने अनुभवी फिरकीपटू सुनील नारीने, रवींद्र जडेजा आणि अमित मिश्रा यांना मागे टाकत दुसरे स्थान मिळवले. आता या विक्रमाच्या यादीत त्याच्या पुढे केवळ युझवेंद्र चहल आहे.
सामन्यानंतर राशीद खानला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी बोलताना त्याने खेळपट्टी सुरुवातीपासूनच फिरकी गोलंदाजांना साथ देणारी असल्याचे सांगितले. Rashids new feat in IPL योग्य टप्प्यावर चेंडू टाकणे आणि गतीत सातत्याने बदल करणे यावर त्याने भर दिला. फलंदाजांना मोकळेपणाने फटके खेळू न देणे हीच आपल्या यशाची गुरुकिल्ली असल्याचेही त्याने स्पष्ट केले.
गुजरात टायटन्ससाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून संघाच्या आगेकूचमध्ये राशीद खानची भूमिका निर्णायक ठरत आहे. Rashids new feat in IPL त्याच्या या घातक गोलंदाजीने पुन्हा एकदा तो जागतिक क्रिकेटमधील सर्वात धोकादायक टी-२० फिरकीपटूंमध्ये का गणला जातो, हे सिद्ध झाले आहे.