संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा उपक्रम

    दिनांक :10-May-2026
Total Views |
यवतमाळ येथे जिल्हा उष्माघात विद्यार्थी मदत कक्ष

यवतमाळ, 
Sant Gadge Baba Amravati University संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग तथा दाते कॉलेज, यवतमाळ यांच्या विद्यमाने जिल्हास्तर उष्माघात विद्यार्थी मदत कक्षाचे उदघाटन दाते कॉलेज येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या कल्पनेतून आणि विद्यार्थी विकास विभागाचे संयोजक प्रा. डॉ. राजीव बोरकर यांच्या प्रयत्नातून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे, असे उद्गार प्राचार्य डॉ. सिंगरू यांनी यावेळी काढले. यावेळी प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे यांनी केले. त्यांनी वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी, आरोग्यविषयक जनजागृती तसेच मदत कक्षाच्या उद्दिष्टांविषयी माहिती दिली. सावित्री ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालयाचे समिती सदस्य डॉ. विक्रांत जाधव यांनीसुद्धा यावेळी मार्गदर्शन केले.
 
 
madad
 
Sant Gadge Baba Amravati University  या उदघाटन समारंभाचे सूत्रसंचालन उष्माघात विद्यार्थी मदत कक्षाचे संयोजक डॉ. प्रशांत बागडे यांनी केले. यावेळी जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रतिनिधी प्रा. डॉ. वानखेडे, आबासाहेब पारवेकर महाविद्यालयाचे डॉ. रूपेश कुèहेकर, विद्याभवन महाविद्यालयाचे प्रा. अनूप शिरभाते यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उष्माघातापासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना, पुरेसे पाणी पिणे, उन्हात बाहेर पडताना घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर महाविद्यालयात उष्माघात कक्षाचे उदघाटन व तेथील सुविधांची पाहणी केली. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण अशा वातावरणात दाते कॉलेज येथे या जिल्हा उष्माघात विद्यार्थी मदत कक्षाचे उद्घाटन पार पडले.