ज्येष्ठ संघ स्वयंसेवक सुधाकर कुलकर्णी यांचे निधन

    दिनांक :10-May-2026
Total Views |
सोलापूर,
Sudhakar Kulkarni passes away राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि सरस्वती मंदिर प्रशालेचे माजी शिक्षक सुधाकर केशवराव कुलकर्णी (मिरीकर) तथा एस. के. कुलकर्णी सर यांचे शनिवार दिनांक ९ मे रोजी दुपारी दोन वाजता बंगळुरू येथे वृद्धापकाळाने निधन झाले.
 
 
Sudhakar Kulkarni passes away
 
निधन समयी ते ८३ वर्षांचे होते. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे, भाऊ, भावजय असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा रविवार दि. १० मे रोजी सकाळी साडेआठ वाजता सोलापुरातील सुपर मार्केट परिसरातील जुनी मिल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, आहेरकर बजाजच्या पाठीमागील निवासस्थानापासून सकाळी साडेआठ वाजता निघेल. एस.के. कुलकर्णी हे बालपणापासून संघ स्वयंसेवक होते. Sudhakar Kulkarni passes away आणीबाणीच्या कालावधीत त्यांनी नाशिक, येरवडा आदी ठिकाणी कारावास भोगला होता. त्यांनी सावरकरांचे जीवनावर अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. विज्ञान शिक्षक म्हणून ते विद्यार्थी प्रिय होते. आकाशवाणी आणि दूरदर्शन वरून त्यांनी व्याख्यानेही दिली होती. आदर्श शिक्षक म्हणून अनेक पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले होते.