हातात हात धरुन दाेन युवकांनी घेतली रेल्वेसमाेर उडी
दिनांक :10-May-2026
Total Views |
- धड अन् शीर वेगळ्या ठिकाणी सापडले मृतदेह
अनिल कांबळे
नागपूर,
Suicide case साेनेगाव पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील उज्ज्वलनगर रेल्वे लाईनवर शनिवारी रात्री दाेन तरुण उभे हाेते. दरम्यान धडधड आवाज करीत भरधाव रेल्वे येत हाेती. दाेन्ही युवकांनी रेल्वे रुळाजवळ येऊन एकमेकांचे हात घट्ट धरले. रेल्वे जवळ येताच दाेघांनीह एकाच वेळी रेल्वेसमाेर उडी घेतली. काही क्षणातच दाेघांच्याही शराराचे तुकडे रुळाच्या शेजारी विखुरले. रेल्वे लाईनमनने पाेलिसांना माहिती दिली. पाेलिसांनी दाेन्ही तरुणांचे छिन्न-विछीन्न झालेले मृतदेहाचे तुकडे अक्षरक्षः गाेळा केले. त्या दाेन्ही युवकांची ओळख अद्याप पटली नाही. त्या तरुणांनी रेल्वेसमाेर उडी घेऊन नेमकी आत्महत्या का केली, याबाबतही माहिती समाेर आली नाही. या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली आहे.
Suicide case माहितीनुसार, शनिवारी रात्री 9.35 च्या सुमारास रेल्वेचे ट्रॅकमॅन जगदीश शिवपाल कामडी यांना ाेनद्वारे माहिती मिळाली की, रेल्वे डाऊन लाईन पाेल क्रमांक 830-2 बीएन ते 829-28 एन दरम्यान अपघात झाला आहे. कामडी यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, तिथे दाेन तरुणांचे मृतदेह विदारक अवस्थेत आढळून आले. अपघाताचे स्वरूप इतके भीषण हाेते की, एका 25 ते 30 वर्षीय तरुणाचे डाेके, हात, पाय आणि धड रेल्वे रुळावर वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले हाेते. तर दुस-या 25 ते 30 वर्षीय तरुणाचे संपूर्ण शरीर छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आले. दाेघांचाही मृत्यू जागीच झाला हाेता. घटनेची माहिती मिळताच साेनेगाव पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. दाेन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी एम्स हाॅस्पिटल, मिहान येथे पाठवण्यात आले आहेत. मृतांची ओळख पटवण्यासाठी पाेलिस प्रयत्न करत असून, सहाय्यक पाेलिस निरीक्षक शितल चामाेले यांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नाेंद केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून रेल्वे पाेलिस आणि स्थानिक पाेलिस अधिक तपास करत आहेत.