सांगली
10th board result राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी 80-90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवत घवघवीत यश मिळवले. तर काहींनी अगदी विक्रमी 100 टक्के गुण मिळवले. पण, सध्या सोशल मीडियावर वेगळ्याच निकालाची चर्चा आहे. यातीलच एक सांगलीतील कमळापूरच्या सूरज योगेंद्र चव्हाण आहे. सूरज सर्वच विषयांत बरोबर 35 गुण मिळवून दहावी काठावर पास झाला आहे.
10th board result खानापूर तालुक्यातील कमळापूरचा सूरज योगेंद्र साळुंखे हा रामपूरच्या न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आहे. त्याने 2026 मध्ये दहावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यावेळी सर्वांना सूरजच्या निकालाबाबत उत्सुकता होती. शुक्रवारी 1 वाजता निकाल जाहीर होताच सूरजचा निकाल पाहिला. त्यावेळी सर्वांना सुखद धक्काच बसला.
10th board result सूरज साळुंखे याला मराठी, हिंदी, इंग्रजी, विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र या सगळ्याच विषयात बरोबर 35 टक्के गुण मिळाले. एकूण 500 पैकी 175 गुण मिळवत तो 35 टक्क्यांनी काठावर पास झाला. त्याचे हे यश मोठ्या टक्केवारीचे नसले तरी अपयशावर मात करणारे नक्कीच आहे.