विदर्भ प्रीमियर लीगसाठी तळेगावच्या जसविंदरसिंग टाकची निवड

    दिनांक :10-May-2026
Total Views |
तळेगाव (श्या. पंत.), 
Vidarbha Premier League येथील ८ वर्षीय क्रिकेटपटू जसविंदर सिंग टाक याने विदर्भ प्रीमियर लीग (व्हीपीएल) मध्ये आपले स्थान निश्चित करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. लिलाव प्रक्रियेत त्याच्यावर १ लाख रुपयांची बोली लागली. त्याची निवड ‘पगरिया स्ट्रायकर्स’ संघात करण्यात आली आहे.
 
 
Vidarbha Premier League
 
जसविंदरच्या या यशामागे त्याचे वडील फिना सिंह टाक यांचे मोठे योगदान आहे. मुलामध्ये क्रिकेटची आवड आणि कौशल्य ओळखून त्यांनी सुरुवातीला त्याला योग्य मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि आवश्यक ते सर्व सहकार्य दिले. जसविंदरने तळेगाव येथील राजस्थान रॉयल्स हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये रोमी भिंडर यांच्या मार्गदर्शनात नियमित सराव सुरू केला होता. Vidarbha Premier League या केंद्रामधून घडलेले १० ते १५ खेळाडू रोमी भिंडर यांच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स संघाच्या खेळाडूंना सरावासाठी सहकार्य करतात. त्यामुळे या केंद्राला युवा क्रिकेटपटूंसाठी एक उत्कृष्ट प्रशिक्षण व्यासपीठ मानले जाते.
 
 
स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये उत्कृष्ट फलंदाजी आणि अष्टपैलू खेळाच्या जोरावर जसविंदरने अनेक सामने गाजवले. आक्रमक खेळशैली, दबावाच्या परिस्थितीत शांतपणे खेळण्याची क्षमता आणि संघासाठी जबाबदारी स्वीकारण्याची तयारी यामुळे निवड समितीचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले. Vidarbha Premier League विदर्भ प्रीमियर लीग ही विदर्भातील प्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धा मानली जाते. पगरिया स्ट्रायकर्स संघाने जसविंदरवर दाखवलेला विश्वास हा त्याच्या कौशल्याची आणि उज्ज्वल भवितव्याची मोठी पावती मानली जात आहे.