चेन्नई,
Thalapathy Vijay तामिळनाडूच्या राजकारणात आज ऐतिहासिक क्षण घडत असून टीव्हीके पक्षाचे प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारण्याची तयारी केली आहे. चेन्नईतील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये सकाळी १०:०० वाजता त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असून नव्या सरकारच्या स्थापनेची औपचारिक घोषणा होणार आहे. या सोहळ्यात त्यांच्यासोबत नऊ मंत्र्यांनाही शपथ दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या बहुमताचा आकडा गाठत विजय यांनी राज्यपालांना पाठिंब्याची पत्रे सादर केली होती. विविध पक्षांच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या गटाला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. Thalapathy Vijay या पाठिंब्यात काँग्रेस तसेच डावे पक्ष आणि इतर घटकांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.
राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या पत्रांमध्ये बहुमताचा आकडा स्पष्ट झाल्यानंतर सरकार स्थापनेसाठी औपचारिक आमंत्रण देण्यात आले. Thalapathy Vijay यानंतर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आणि विजय समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, विजय यांचा मुख्यमंत्रीपदाचा प्रवास सहज नव्हता. निवडणुकीनंतर काही दिवस राज्यात मोठे राजकीय घडामोडींचे सत्र सुरू राहिले. Thalapathy Vijay बहुमतासाठी आवश्यक पाठिंबा मिळवण्यासाठी सलग चर्चांचा आणि बैठकींचा सिलसिला सुरू होता. विविध पक्षांच्या पाठिंब्याच्या घोषणांनंतर अखेर सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. या संपूर्ण घडामोडींमुळे तामिळनाडूच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होत असल्याचे मानले जात आहे. विजय यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार राज्याच्या विकासाला कोणती दिशा देते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.