चेन्नई,
urvil-patels-celebration : चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ५ गडी राखून एक महत्त्वपूर्ण सामना जिंकून आयपीएल २०२६ मधील प्लेऑफच्या शर्यतीत आपले स्थान कायम ठेवले आहे. चेपॉक स्टेडियमवर २०४ धावांचे लक्ष्य गाठताना, सीएसकेच्या २७ वर्षीय उर्विल पटेलच्या धडाकेबाज ६५ धावांनी सामना एकतर्फी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. उर्विल पटेलने केवळ १३ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले नाही, तर अनेक मोठे विक्रमही मोडले. इतकेच नाही, तर अर्धशतक पूर्ण केल्यानंतर उर्विल पटेलने चिट्टीवर केलेला जल्लोष सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनला होता, ज्यामध्ये त्याने आपल्या वडिलांसाठी एक खास संदेश पाठवला होता.
उर्विलने त्या चिट्टीवर काय लिहिले होते?
या सामन्यात जेव्हा उर्विल पटेल फलंदाजीसाठी मैदानात उतरला, तेव्हा चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आधीच ४५ धावा केल्या होत्या. मैदानात येताच उर्विलने आपल्या खेळीच्या पहिल्या आठ चेंडूंमध्ये सहा षटकार ठोकले. त्यानंतर त्याने १३ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि आयपीएलमधील सर्वात कमी वेळेत अर्धशतक पूर्ण करण्याचा यशस्वी जयस्वालच्या विक्रमाची बरोबरी केली. अर्धशतक पूर्ण केल्यावर, उरविलने प्रथम हात जोडून देवाचे आभार मानले आणि नंतर आपल्या खिशातून एक कागदाची चिठ्ठी काढली, ज्यावर लिहिले होते, "हे तुझ्यासाठी आहे, बाबा." उरविलने त्या कागदावर गुजरातीमध्ये एक खास संदेशही लिहिला होता.
उरविलने धोनीला मागे टाकले, रैनाचा विक्रम मोडण्याची संधी थोडक्यात हुकली
लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात, उरविल पटेलने आपल्या ६५ धावांच्या खेळीत २३ चेंडूंचा सामना केला आणि त्याचा स्ट्राइक रेट २८२.६ होता. आयपीएलमध्ये किमान २० डाव खेळलेल्या कोणत्याही सीएसके फलंदाजासाठी हा दुसरा सर्वोच्च स्ट्राइक रेट आहे. या बाबतीत उर्विलने धोनीला मागे टाकले, ज्याने २०१२ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध २० चेंडूंमध्ये २५५ च्या स्ट्राईक रेटने ५१ धावा केल्या होत्या. २०१४ च्या आयपीएल हंगामात पंजाब किंग्सविरुद्ध २५ चेंडूंमध्ये ८७ धावा करून यादीत अव्वल स्थानी असलेल्या सुरेश रैनाचा स्ट्राईक रेट ३४८ होता.