वर्धेत दोन हॉटेल्स जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान

    दिनांक :10-May-2026
Total Views |
* न्यू आर्ट कॉलेज पुढील घटना
 
वर्धा, 
Two hotels burnt down in Wardha शहरातील दादाजी धुनिवाले ते आर्वी नाका मार्गावरील न्यू आर्ट कॉलेजच्या पुढे असलेल्या दोन हॉटेल्सला आग लागली. यात दोन्ही हॉटेल जळून खाक झाले. ही आग आज रविवार १० रोजी सकाळी.आग इतकी भीषण होती की अवघ्या १५ मिनिटांत सर्व काही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ज्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचे सांगण्यात येते.
 
 
shop
 
बॅचलर मार्गावर न्यू आर्ट कॉलेज पुळे बार्बेयू पाव भाजी, एलओसी आणि हँगआउट कॅफे अ‍ॅण्ड रेस्टॉरंट आहेत. बार्बेयू पाव भाजी आणि एलओसी यांना एकाच मीटरमधून वीजपुरवठा होत होता. विजेचा दाब अचानक वाढल्याने शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. सोसाट्याचा वारा आणि दुकानांमधील ज्वलनशील वस्तूंमुळे आगीचा भडका उडाला. आगीने बार्बेयू आणि हँगआउट कॅफे अ‍ॅण्ड रेस्टॉरंट या दोन हॉटेल्सला वेगाने आपल्या कवेत घेतले. बार्बेयू आणि एलओसी इन हॉटेल यांच्यामधील ग्रॅनाइटच्या भिंतीमुळे आग एलओसी हॉटेलमध्ये अधिक पसरण्यापासून रोखली गेली. तथापि, सारिका शेंद्रे यांच्या मालकीचे हँगआउट कॅफे अ‍ॅण्ड रेस्टॉरंट आणि राहुल जाधव यांच्या मालकीचे बार्बेयू पाव भाजी हे दोन्ही जळून खाक झाले. हॉटेलचे रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, खाद्यपदार्थ, सोफे आणि फर्निचर हे सर्व जळून खाक झाले. आग इतकी भीषण होती की अवघ्या १५ मिनिटांत सर्वकाही जळून खाक झाले. सुदैवाने, सकाळी हॉटेल बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
 
 
Two hotels burnt down in Wardha  आग लागल्याचे लक्षात येताच, रहिवाशांनी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच, अग्निशमन विभागाचे प्रमुख अशोक लोखंडे, विशाल नाईक आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीची माहिती मिळताच नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला. तरुण उद्योजक सारिका शेंद्रे आणि राहुल जाधव यांचे नुकसान झाले आहे. त्यांनी महावितरण योजनेकडे आर्थिक मदतीची मागणी केली. नगरपालिकेच्या योजनेअंतर्गत तरुण उद्योजकांना मदत देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन नगराध्यक्ष पांगुळ यांनी दिले.