* अनेक घरांचे टिनपत्रे उडाले
समुद्रपूर,
Unseasonal rain तालुयातील तावी येथे शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सुरू झालेल्या वादळाने अनेक घरांचे टिनपत्रे उडाले तर गावातील पाच विद्युत खांब उन्मळून पडले. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे वीजपुरवडा खंडित झाल्याने नागरिकांना रात्र काळोखात काढावी लागली.
Unseasonal rain शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तावी येथे अवकाळी पाऊस व वादळाला सुरुवात झाली. अवघ्या २० मिनिटातच वादळामुळे अनेक घरांचे टिनपत्रे उडाले. यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले. रस्त्यावरील वीज वितरण कंपनीचे इलेट्रिकचे लोखंडी खांब कोसळल्याने गावातील वीजपुरवठा खंडित झाला. यावेळी संपूर्ण गावाला काळोखात रात्र काढावी लागली. घटनेची माहिती मिळताच मोहगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक विलास नवघरे, तंटामुत समितीचे अध्यक्ष अनिल धोटे यांनी घटनास्थळी जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यासंबधी तहसीलदार कपिल हाटकर व तलाठी प्रदीप मानकर यांना माहिती दिली. झालेल्या नुकसानीची पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रशासक विलास नवघरे यांच्यासह गावकर्यांनी केली आहे.