आर्णी :
Uttamrao Deshmukh English Medium School स्व. उत्तमराव देशमुख इंग्लिश मिडियम स्कुलचे फेब्रुवारी २०२६ दहावी बोर्ड मान्यतेचे पहिलेच वर्ष असल्याने या वर्षी शाळेतील विद्यार्थ्यी प्रथमच बोर्डाच्या परिक्षेला सामोरे गेले. बोर्ड परीक्षेचा कोणताही अनुभव नसताना शिक्षक व विद्यार्थ्यांच्या परिश्रमातून या परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून त्यांचे कौतुक होत आहे.
Uttamrao Deshmukh English Medium School यशस्वी किशोर सावंत ८८.६० गुणासह प्रथम, पुजा प्रेम राठोड ८८.४० द्वितीय, आनंदी सुमेध बागेश्वर ८७.८० तृतीय, श्रावणी भीमराव ठाकरे ८६.६० चौथी, शिवानंद बळीराम वंजारे ८१.८० पाचवी, तेजस्विनी सुधाकर राठोड ८१ टक्के गुणांसह शाळेतून सहावी आली. परीक्षेला बसलेले एकूण बाराही विद्यार्थी प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. त्यामुळे त्यांचे सर्वत्र होत आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थाध्यक्ष डॉ. पंडित चव्हाण, मु‘याध्यापक कोमल चव्हाण, पंकज ठाकरे, व्यवस्थापक उल्हास चव्हाण, पर्यवेक्षक आशिष मोरे, शिक्षक अनिल गेडाम, साजिद शेख, निकिता दहीकर, प्रीती अंदुरेसह आई-वडिलांना दिले आहे.