विवेकानंद विद्यालयात गुणवंतांचा गौरव

    दिनांक :10-May-2026
Total Views |
यवतमाळ, 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकालात Vivekananda Vidyalaya 10th class results विवेकानंद विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या लौकिकास साजेशी उत्तम कामगिरी बजावली. शालांत परीक्षेतील शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम राखत १४८ पैकी १३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण टक्के आहे. उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी पुष्कर शैलेश दुधे, वेदांत प्रकाश रोकडे, जीवन अश्विन पाटील, ओम अरविंद ढुमणे आणि रुद्रांश प्रवीणकुमार आजने हे नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी त्यांच्या पालकांसह शनिवारी सकाळी शाळेत उपस्थित झाले.
 
 
Vivekananda Vidyalaya
 
Vivekananda Vidyalaya 10th class results  त्यांनी आपापल्या गुणपत्रिका मोठ्या उत्साहात शाळेतील मु‘याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षकांना दाखवून आनंद केला. यानिमित्ताने झालेल्या छोटेखानी कार्यक‘मात शाळेचे मु‘याध्यापक विवेक अलोणी, पर्यवेक्षक विवेक कवठेकर, माजी मु‘याध्यापक मीनाक्षी काळे यांनी या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व पेढा भरवून कौतुक केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी, शाळेने वर्षभर केलेल्या मार्गदर्शनाप्रती कृतज्ञता व्यक्त करून आपल्या यशाचे श्रेय शाळेतील संस्कार, शिस्त व शैक्षणिक उपक‘मांनाच सांगितले. यापुढेही आपण अशीच उत्तमोत्तम कामगिरी करून स्वतःसोबतच शाळेचा लौकिक वाढवू, असा विश्वास यावेळी विद्यार्थ्यांनी बोलून दाखवला. याप्रसंगी दहावीचे वर्गशिक्षक संतोष पवार, हेरंब पुंड, दिनेश गहरवार, त्यासोबतच क‘ीडाशिक्षक प्रफुल्ल गावंडे, नीलेश पत्तेवार, जया बेहरे, पूनम नैताम, वरिष्ठ लिपिक अनिरुद्ध पटाईत, सचिन ढोबळे उपस्थित होते.