दारूबंदी जिल्ह्यात तीन दिवसात १ कोटी ७० लाखांची दारू नष्ट

    दिनांक :10-May-2026
Total Views |
वर्धा, 
वर्धा पोलिस दलाने ६ ते ८ मेदरम्यान जिल्हाभर Washout campaign वॉशआउट मोहीम राबवून तब्बल १ कोटी ६९ लाख २३ हजार रुपयांचा दारू जप्त करून नष्ट केला. या धडक कारवाईत जिल्ह्यामध्ये ६८ अवैद्य देशी-विदेशी दारू विक्रीचे आणि १६१ गावठी दारू विक्रीचे असे २२९ गुन्हे दाखल करण्यात आले.
 
 
DESTROY
 (संग्रहित छायाचित्र )
 
 
पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन या Washout campaign वॉशआऊट मोहीमची योजना आखली. जिल्ह्यातील ४ उपविभागीय पोलिस अधिकारी, ५७ अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा व इतर शाखांचे असे २७० पोलिस अंमलदार यांची १९ पोलिस स्टेशनमध्ये वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. पहाटे ४ वाजतापासून या सर्व गावठी दारूभट्टीची ठिकाणे आणि देशी विदेशी दारूची विक्री करण्याच्या ठिकाणावर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. या अचानक केलेल्या वॉशआऊट मोहिमेमुळे अवैध दारू तयार करणारे, पुरवठादार आणि विक्रेते यांचे धाबे दणाणले आहेत.