नागपूर,
WESTERN COALFIELDS LIMITED वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (डब्ल्यूसीएल) च्या तेजस 2.0 उपक्रमांतर्गत सहभागी अधिकाऱ्यांसाठी “संतुलित आहार व योग्य शारीरिक बैठक” या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. नर्व स्टीमूलेशन थेरेपिस्ट व योग थेरेपिस्ट डॉ. प्रवीण डबली यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सत्रामध्ये चुकीच्या बसण्याच्या व काम करण्याच्या सवयींमुळे उद्भवणाऱ्या शारीरिक समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच योग्य शारीरिक बैठकीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.डॉ. डबली यांनी योग्य बैठकीमुळे पाठदुखी व मानदुखी कमी होणे, श्वसन प्रक्रिया सुधारणे,WESTERN COALFIELDS LIMITED एकाग्रता व कार्यक्षमता वाढणे तसेच स्नायू व हाडांशी संबंधित समस्यांपासून बचाव होण्यास मदत होते, असे सांगितले. त्यांनी दैनंदिन जीवनात सहज अवलंबता येतील अशा एर्गोनॉमिक्स व बैठक सुधारण्याच्या सोप्या तंत्रांची माहिती दिली.हे सत्र संवादात्मक व उपयुक्त ठरले असून सहभागी अधिकाऱ्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. तेजस 2.0 माध्यमातून डब्ल्यूसीएल अधिकाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.
सौजन्य:प्रवीण डबली,संपर्क मित्र