अमोल घोडे यांना ‘युथ लीडर अँड अनसंग एव्हरीडे हिरो’ पुरस्कार

    दिनांक :10-May-2026
Total Views |
मंगरूळनाथ, 
अमोल घोडे यांना आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या वतीने ‘Youth Leader and Unsung Everyday Hero’ Award ‘युथ लीडर अँड अनसंग एव्हरीडे हिरो अवॉर्ड’ प्रदान करून गौरविण्यात आले.अकोला येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. बेवारस, बेघर व गरजू व्यक्तींसाठी गेल्या अनेक वर्षांपासून समर्पित भावनेने सामाजिक कार्य करणार्‍या अमोल घोडे यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे समाजात मानवतेचा संदेश पोहोचत असून विविध स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
 

amol 
 
मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी मदतीचा हात द्या, हे अमोल घोडे यांचे ब्रीदवाय असून त्यानुसार ते मानव सेवा फाऊंडेशन च्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. संस्थेच्या वतीने जवळपास एक हजार बेवारस व बेघर व्यक्तींचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तसेच सुमारे २०० दिव्यांगांना व्हीलचेअरचे वाटप, १०० हून अधिक मनोरुग्णांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचविणे, गरजूंसाठी मोफत अ‍ॅम्बुलन्स सेवा, रोटी बँक उपक्रम तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये ब्लँकेट वाटप असे विविध उपक्रम राबविले जात आहेत.
 
 
‘Youth Leader and Unsung Everyday Hero’ Award  पुरस्कार स्वीकारताना अमोल घोडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हा पुरस्कार केवळ माझा नसून समाजासाठी काम करणार्‍या प्रत्येक सहकार्‍याचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले. या गौरवामुळे समाजसेवेची प्रेरणा अधिक बळकट झाली असून भविष्यातही गरजूंकरिता कार्य सुरू ठेवणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.