अकरावी प्रवेशाचा ‘श्रीगणेशा’

    दिनांक :11-May-2026
Total Views |
पाच टप्प्यांत होणार प्रक्रिया

यवतमाळ, 
दहावीचा निकालाची प्रतीक्षा संपली असून, सोमवार, 11 मे पासून 11th admission process अकरावी प्रवेश प्रक्रियेचा श्रीगणेशा झाला आहे. जिल्ह्याचा निकाल 88.38 टक्के लागल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या पुढच्या प्रवासाचा मार्ग मोगळा झाला आहे असून, अकरावी प्रवेश प्रक्रियेला खèया अर्थाने वेग आला आहे. विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला भाग भरता येणार असून, ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 या कालावधीत दहावीचा परीक्षा घेतली. तर शुक्रवार, 8 मे रोजी दहाव्या वर्गाचा ऑनलाईन निकाल मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे.
 
 
admission
 
11th admission process  जिल्ह्याचा निकाल 88.38 टक्के लागला आहे. यात 16 हजार 524 मुले तर 16 हजार 620 मुली, असे एकूण 33 हजार 144 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत 3 टक्क्यांनी निकाल घसरला आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडण्याची शक्यता आहे. असे असले तरी मंडळाने अर्जाचा भाग एक भरून घेण्यास 10 एप्रिलपासून सुरवात केली होती. सोमवारपासून 11 वी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मंडळाच्या अधिकृत पोर्टलवार विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. 11 ते 13 मे या कालावधीत शैक्षणिक पात्रतेची माहिती भरून अर्जाचा भाग एक सादर करणे, आवश्यक वाटल्यास विद्यार्थ्यांना भाग दोनसाठी अर्ज करता येतो. विशेष म्हणजे एक ते दहा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राधान्य नोंदवता येणार आहे. शुक्रवार, 15 मे रोजी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. यादीवर हरकती दुरुस्ती मागणी नोंदणीसाठी दोन दिवसांचा अवधी आहे. सोमवार, 18 मे रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतिम होणार आहे. व्यवस्थापन इन-हाऊस अल्पसंख्याक कोटासाठी झिरो राऊंड वाटप मंगळवार, 19 मे पर्यंत करता येणार आहे.