नागपूर,
Students celebrate with enthusiasm महालक्ष्मी मंदिर, मधुबन लेआउट आणि लोककल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १५ दिवसीय संस्कार वर्गाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गेल्या २२ वर्षांपासून अव्याहत सुरू असलेल्या या संस्कार वर्गाचे आयोजन २६ एप्रिल ते १० मे २०२६ या कालावधीत करण्यात आले होते. समारोप कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मधुरा गडकरी आणि डॉ. नेहा वेले हणवंते उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कार वर्गाचे आयोजक तसेच मंदिराचे अध्यक्ष शरदचंद्र लांबे होते. यावेळी लोककल्याण समितीचे पदाधिकारी डॉ. शाम अंधारे, दीपक झरगर, नरेंद्रनगर भाग सेवा प्रमुख पद्माकर साठे, भाग सेवा सहप्रमुख श्रीरंग माईनकर, महेंद्र पिदडी, सोसायटीचे सचिव अतुल जोशी आणि डॉ. शिल्पा घाटबांधे उपस्थित होते.

पंधरा दिवसांच्या संस्कार वर्गात विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीत, स्तोत्र पठण, प्रातःकालीन व सायंकालीन प्रार्थना, योगासने, संस्कृत संभाषण कौशल्य, स्मरणशक्ती स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच श्रीमद्भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायाचे पठण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. डॉ. शाम अंधारे यांनी साराक्षी नेत्रालयाच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिरही आयोजित केले. Students celebrate with enthusiasm संस्कार वर्गात प्रभात फेरी, विविध स्पर्धा आणि गीतेवर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले. रेणुका देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दोन विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली, तर काही विद्यार्थ्यांनी संस्कृत संभाषण आणि संस्कृतमधील कथानक सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. दहावीच्या परीक्षेत विशेष यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. नागपूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या सायली शिरीष कुकडे हिने ९८.६० टक्के गुण प्राप्त केले. कोणताही खासगी वर्ग न लावता आत्मविश्वास आणि अथक मेहनतीच्या जोरावर हिरण्या देशकर यांनी ९५.६० टक्के, तर सौम्या पिदडी यांनी ९५.२० टक्के गुण मिळवले. सायली कुकडेच्या यशाविषयी रोहिणी अलोणी यांनी तिची छोटेखानी मुलाखत घेतली.
मधुरा गडकरी यांनी विद्यार्थ्यांना संस्कार वर्गाचे महत्त्व पटवून दिले, तर डॉ. नेहा हणवंते यांनी आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रेरणादायी कथा सांगितली. Students celebrate with enthusiasm कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रोहिणी अलोणी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय मंदिराच्या कोषाध्यक्ष आसावरी कोठीवान यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन मनीषा टामणे यांनी केले. योग प्रात्यक्षिक रागिणी नगरकर यांनी सादर केले. देशभक्तीपर गीत कल्याणी पिदडी यांनी, प्रार्थना सरिता शर्मा यांनी, तर मनाचे श्लोक मनीषा टामणे यांनी सादर केले. रागिणी नगरकर यांनी गीतेतील बाराव्या अध्यायातील श्लोक विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतले.
या वेळी दोन पालकांनी संस्कार वर्गामुळे मुलांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांविषयी मनोगत व्यक्त केले. विविध स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. अनेक सेवाभावी नागरिकांनी पंधरा दिवस विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. Students celebrate with enthusiasm सरिता शर्मा यांच्या पसायदानाने आणि अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. विशेष म्हणजे, कोणतेही मानधन न घेता सर्व शिक्षकांनी पंधरा दिवस विद्यार्थ्यांवर संस्कार घडविण्यासाठी मनापासून अथक परिश्रम घेतले.
सौजन्य: आसावरी कोठीवान, संपर्क मित्र