आंबे घेऊन जाणारा ट्रक उलटला; पादचारी गंभीर

खरांगणा (मो.) शिवारातील घटना

    दिनांक :11-May-2026
Total Views |

f567567
 
खरांगणा (मो.),
A truck carrying mangoes overturned. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आंबे घेऊन जाणारा ट्रक उलटला. या अपघातात ट्रकची धडक लागल्याने पादचारी गंभीर जखमी झाला. हा अपघात आज सोमवार ११ रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास वर्धा-आर्वी मार्गावरील खरांगणा (मोरांगणा) शिवारात घडला. तेलंगणा राज्यातील सिद्धीपेठ येथून आष्टा भोपाळ येथे एम. पी. १३ जी. बी. २८४१ क्रमांकाचा ट्रक एस. एस. फ्रुट कंपनी आष्टा कंपनीचे आंबे घेऊन जात होता. दरम्यान, खरांगणा (मोरांगणा) शिवारात सकाळी ६ वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. यावेळी रस्त्याच्या कडेला पायदळ जात असलेल्या दिवाकर लाडे (६५) यांना ट्रकने धडक दिली. यात दिवाकर लाडे गंभीर जखमी झाले. दिवाकर लाडे यांना सेवाग्राम रुग्णालयात भरती करण्यात आले. आवाज येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती देत मदत केली. याप्रकरणी खरांगणा (मोरांगणा) पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया वृत्तलिहिस्तोवर सुरू होती. घटनास्थळी खरांगणा (मोरांगणा) पोलिस ठाण्याचे कर्मचारी सतीश वैरागडे, प्रवीण राठोड, अंकुश साबळे, रवींद्र मोहर्ले, सतीश अहेर यांनी भेट देऊन पंचनामा करत केला.