डीबी पथकाची कारवाई
यवतमाळ,
Action against gutkha sale छोटी गुजरी येथे गुटखा उतरला जात असल्याची माहिती यवतमाळ शहर डीबी पथकाला मिळाली. या माहितीवरून त्या ठिकाणी छापा मारून मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. या कारवाईदरम्यान बाजीराव गोल्ड पान मसाल्यात 76 हजार 800 रुपयांचे व मस्तानी सुगंधी तंबाखूचे एकूण 16 हजार रुपये असा एकूण 92 हजार 800 रुपयांचा प्रतिबंधीत अन्न पदार्थांचा साठा आढळून आला.
तसेच देविका ट्रान्सपोर्ट मालक युफियांखान बशीरखान (आदर्शनगर, पांढरकवडा रोड, यवतमाळ) यांच्या गॅरेजमध्ये बाजीराव गोल्ड पानमसालाचे एकूण किंमत 51 हजार 200 रुपये व मस्तानी सुगंधी तंबाखूचे एकूण किंमत 22 हजार 400 रुपये असा एकूण 73 हजार 600 रुपयाचा प्रतिबंधीत अन्नपदार्थांचा साठा आढळून आला. त्यामुळे दोन्ही ट्रान्सपोर्ट मालकासह एकूण किंमत 1 लाख 66 हजार 400 रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई अन्न व औषध प्रशासनाने तक्रार दिल्याने कारवाई करण्यात आली आहे.
Action against gutkha sale ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने, ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रगटीकरण पथकाचे उपनिरीक्षक गणेश सपकाळ, दीपक घोगरे, रावसाहेब शेंडे, किरण पडघण, प्रवीण खंडारे, गौरव ठाकरे, पवन नांदेकर, पवन तडसे, मयुर तेल्लेवार, अमित अशोककुमार यांनी पार पाडली.