यवतमाळ,
Avadhootwadi police action सध्या शहर व परिसरात गांजा सेवन तसेच अमली पदार्थांच्या नशेमुळे तरुण पिढी बिघडत असल्याचे प्रकार वाढत असल्याने पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी जिल्ह्यात अमली पदार्थ विक्री, वाहतूक व सेवन करणाèयांवर कठोर कारवाई करण्याबाबत सर्व पोलिस ठाण्यांना आदेश केले होते. त्यानुसार अपर अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनात अवधूतवाडी पोलिस ठाणे यांनी विशेष मोहीम राबवून एनडीपीएस कायद्यांतर्गत धडक कार्यवाही केली.
Avadhootwadi police action ही कारवाई पोलिस निरीक्षक नंदकिशोर काळे यांच्या नेतृत्वात सापळा रचून अवधूतवाडी पोलिस ठाणे हद्दीतील ‘हिस्ट्रीशीटर’ आरोपी राजू बाबूलाल कनोजे याच्याकडून 124 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. तसेच बाबू उर्फ केशव महादेव शिरभाते व वसंता गुलाब भिसे रा. माथा कळंब यांचेकडून जवळपास अंदाजे 2600 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदरचे तिन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलिस उपनिरीक्षक सूरज जगताप, पोलिस हवालदार सुरेश मेशाम, विशाल भगत, बलराम शुक्ला, मोहम्मद भगत, वाले, भुसारी, गजानन दूधकोहळे, राज कांबळे, योगेश चोपडे, सचिन राठोड तसेच इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली.