भुवनेश्वरने पटकावली पर्पल कॅप!

    दिनांक :11-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Bhuvneshwar wins Purple Cap आयपीएल २०२६ आता अंतिम टप्प्याकडे सरकत असून प्लेऑफच्या शर्यतीसोबतच ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठीची चुरसही रंगतदार झाली आहे. रविवारी झालेल्या दोन महत्त्वाच्या सामन्यांनंतर पर्पल कॅपच्या यादीत मोठा बदल पाहायला मिळाला. भुवनेश्वर कुमार याने शानदार गोलंदाजी करत पर्पल कॅप आपल्या नावावर केली आहे.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सवर शेवटच्या चेंडूवर थरारक विजय मिळवला. या सामन्यात भुवनेश्वर कुमारने चार षटकांत केवळ २३ धावा देत चार महत्त्वाचे बळी घेतले. गोलंदाजीसोबतच शेवटच्या टप्प्यात त्याने मारलेला महत्त्वाचा षटकारही संघाच्या विजयात निर्णायक ठरला. या कामगिरीमुळे त्याच्या विकेट्सची संख्या ११ सामन्यांत २१ वर पोहोचली आणि त्याने पर्पल कॅपवर कब्जा केला.
 
 

purple cap bhuvanesh 
यापूर्वी अव्वल स्थानी असलेला अंशुल कंबोज आता १९ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. कागिसो रबाडा १८ विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर प्रिन्स यादव आणि इशान मलिंगा यांनी प्रत्येकी १६ विकेट्स घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत आपली दावेदारी कायम ठेवली आहे. रशीद खान १५ विकेट्ससह सहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, ऑरेंज कॅपची शर्यतही अधिक रंगतदार झाली आहे. सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक-फलंदाज हेनरिक क्लासेन सध्या सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ११ सामन्यांत ४९४ धावा करत ऑरेंज कॅप आपल्या नावावर ठेवली आहे. त्याचा स्ट्राइक रेट १५७ इतका प्रभावी राहिला आहे.
भिषेक शर्मा ४७५ धावांसह दुसऱ्या स्थानावर असून केएल राहुल ४६८ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल ४६२ धावांसह चौथ्या स्थानी आहे. साई सुदर्शन आणि वैभव सूर्यवंशी यांनी प्रत्येकी ४४० धावा केल्या असून ते पुढील स्थानांवर आहेत. तर संजू सॅमसन ४३० धावांसह सहाव्या क्रमांकावर कायम आहे.