माऊली सेवा मित्र मंडळाचा वृध्दाश्रमात सेवाभावी उपक्रम

    दिनांक :11-May-2026
Total Views |
नागपूर,
Mauli Seva Mitra Mandal माऊली सेवा मित्र मंडळाच्या वतीने रविवारी माधव नगर येथील एका वृध्दाश्रमाला भेट देऊन सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. मंडळाच्या सदस्यांनी वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांना आपुलकी व प्रेमाचा आधार दिला. यावेळी संस्थेला डिस्प्ले फ्रिज भेट देण्यात आला. तसेच रहिवाशांना राजगिरा लाडूंचे वाटप करण्यात आले. मंडळातील सदस्यांनी वृध्दाश्रमातील ज्येष्ठांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
 
Mauli Seva Mitra Mandal
 
भेटीदरम्यान आजच्या विभक्त कुटुंब व्यवस्थेमुळे ज्येष्ठ नागरिकांना वृध्दाश्रमाचा आधार घ्यावा लागत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत ज्येष्ठांना मानसिक आधार देणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. Mauli Seva Mitra Mandal वृध्दाश्रमातील कर्मचारी, डॉक्टर व सेवकवर्ग ज्येष्ठांची अत्यंत जिव्हाळ्याने सेवा करत असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. तसेच महिलांच्या पुनर्वसनासाठी व गरजू घटकांना मदत करण्यासाठी संस्थेकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमानंतर पुढील सेवाकार्याच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. शेवटी सर्वांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य: सुहास खरे, संपर्क मित्र