दिग्रसला 200 किलो गोमांस व 14 गोवंश जप्त

    दिनांक :11-May-2026
Total Views |
कारवाईस विलंब का ; भाजपाने खडसावले

दिग्रस, 
Cow seized from Digras मोतीनगर परिसरात तब्बल 200 किलो गोमांस व 14 गोवंश ताब्यात घेऊन रविवार, 10 मे रोजी स्थानिक पोलिसांनी सकाळी कारवाई केल्याने चांगलीच खळबळ उडाली. मोतीनगर भागात तीन अवैध कत्तलखान्यांत निर्दयपणे गोवंश डांबून ठेवण्यात आल्याच्या माहितीवरून आयपीएस परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक तथा ठाणेदार डॉ. तेजस सारडा यांनी शिताफीने धाड टाकून मोठी कारवाई केली. मात्र या घटनेसंदर्भात कोणतीच माहिती न दिल्याने नागरिकांत तर्कवितर्काने चर्चा रंगली.
 
 
sarada
 
Cow seized from Digras  अखेर याबाबत सोमवार, 11 मे रोजी भाजपा शहराध्यक्ष अभय इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. गजानन निचत, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष म. आतिक म. इस्राईल व व्हीजेएनटी सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज राठोड, विधानसभा प्रमुख अरुण राठोड व मन की बात प्रमुख रमेश करवा यांनी ठाणेदार सारडा यांची भेट घेतली असता त्यांनी त्वरित घटनेची प्रेस नोट काढून विषय हातावेगळा केला. मोतीनगर येथील मो. अस्लम शेख उस्ताद, शेख आवेश शेख रफिक व शेख अजहर शेख हुसेन यांनी कत्तलीच्या उद्देशातून 14 गोवंश अत्यंत क्रूरपणे डांबून ठेवल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्याच्या हातून सुटका करून गोवंश सुरक्षित ठिकाणी हलविले. तसेच शहरातील आर्णी नाका, मोतीनगर परिसरात पोलीसांच्या कारवाईत मोतीनगरातील मो. तौफिक अब्दुल खल्लीद, मो. वाजिद मो. अब्दुल गफ्फार यांना गोवंश कापताना रंगेहात पकडले. गोवंश मासाचे लहान मोठे तुकडे करून एकूण 200 किलोे मांस व सुरी, तराजू व इतर साहित्य जप्त केले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हे नोंद केल्याचे पोलीसांकडून जाहीर करण्यात आले.

कारवाई करण्यात पोलिसांपुढे अडचणी
दिग्रस पोलिस ठाण्यात कर्मचारी कमी आहेत. त्यापैकी अनेक रजेवर असल्यानेही अडचण होती. तसेच माहिती जाहीर करण्यापेक्षा गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करणे हे जास्त महत्वाचे आहे व माझी काम करण्याची तशी पद्धत आहे. त्यासाठी कोणी काहीही तर्क लावल्यास मला फरक पडणार नाही. कारण गोवंश कत्तलखाने हे नगर परिषदच्या मालकीचे आहेत. त्यांची काहीच जबाबदारी नाही का, याबाबत नपचे मुख्याधिकारी गंभीर नाहीत, असे दिसते.
ठाणेदार डॉ. तेजस सारडा