नागपूर,
Gold and silver rates एका वर्षाच्या कालावधीसाठी सोन्याची खरेदी करणे टाळावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर सोमवारी सोन्याचे दर कमी झाले तर चांदीचे दर वाढले शनिवारी सोन्याचा दर १,५२,२०० रुपये प्रति १० ग्रॅम वर होता, तर चांदी २,५१,००० रु. प्रति किलोचा दर होता. सोमवारी सोन्याचे दर १,५१,९०० रुपये प्रति १०गॅम तर चांदी २,६०,२०० रु. प्रति किलो होती. दागिने उद्योगाचे मोठे नुकसान होण्याची भीती
Gold and silver rates मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना वर्षभर सोने खरेदी टाळण्याचे आवाहन नरेंद्र यांनी केल्याने देशभरात चर्चा सुरू झाली आहे. दागिने उद्योग केवळ सोने, चांदी किंवा हिर्यांपुरता मर्यादित नाही, तर त्याच्याशी अनेक पूरक उद्योग निगडित आहेत, जे लाखो लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार पुरवतात आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे वर्षभर सोने-चांदी खरेदी न केल्यास दागिने उद्योगाचे मोठे नुकसान भीती असल्याचे मत जीजेसीचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी व्यक्त केले आहे.