श्री समर्थ विद्यालयाची यशाची परंपरा कायम

    दिनांक :11-May-2026
Total Views |
माध्यमिक शालांत परीक्षेत 95.83 टक्के निकाल
हदगाव तालुक्यात द्वितीय क्रमांक

हदगाव, 
Hadgaon: Shri Samarth Vidyalaya श्री समर्थ विद्यालय पिंपरखेड विद्यालयाने 2025-26 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश संपादन करत 95.83 टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. उत्कृष्ट निकालाच्या जोरावर विद्यालयाने हदगाव तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला असून ग्रामीण भागातील शाळेने उज्ज्वल परंपरा कायम राखली.
 
 
pimpar
 
Hadgaon: Shri Samarth Vidyalaya  विद्यालयातील सर्व 73 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. प्रथम क्रमांक पूजा दत्तराव भोयर हिने 94.20 टक्के गुणांसह मिळविला. द्वितीय क्रमांक माऊली अमोल कदम 90.40 टक्के, तर तृतीय क्रमांक अबुजर बिबन शेख याने 88.20 टक्के गुण मिळवून पटकावला. गौरी राजू येवले याने 86.60 तर अस्मिता सतीष हादरगे याने 86.40 टक्के गुण प्राप्त करून विशेष यश मिळविले. या निकालात 20 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले असून 20 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 21 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालय सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थाध्यक्ष डॉ. सुदर्शन राम भारती, मुख्याध्यापक सूर्यवंशी तसेच शिक्षकवृंदांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.