जेईई-नीट स्क्रीनिंग टेस्टमध्ये विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

    दिनांक :11-May-2026
Total Views |
कोरची, 
In JEE-NEET screening test नागपूर येथे आयजित जेईई व नीट पुरुष स्क्रीनिंग टेस्टच्या अंतिम गुणवत्ता यादीत एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल कोरची व गेवर्धा येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत शाळेचा लौकिक उंचावला आहे. या उल्लेखनीय यशामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, दोन्ही शाळांचे प्राचार्य धर्मेंद्र सिंह ठाकुर यांच्या कुशल नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. सातत्यपूर्ण मार्गदर्शन, नियोजनबद्ध अभ्यास आणि शिक्षकांच्या मेहनतीमुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
 
 

gh678 
 
जेईई अंतिम निवड यादीत एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल कोरची येथील जतिन परमानंद बंजार, श्रीकांत राजू वट्टी आणि अवन राजाराम अडकदुल्हा यांची निवड झाली असून, गेवर्धा येथील ऋतिक कलपाटे यानेही अंतिम यश संपादन केले आहे.
तसेच जेईई प्रतीक्षा यादीत कोरची येथील प्रशांत मरकाम, प्रतीक मरकाम, राहुल विजय ताराम, शरद विकास कन्नाके आणि मुकेश चरणदास घासले यांचा समावेश आहे. नीट प्रतीक्षा यादीत गेवर्धा येथील शैलेन्द्र पेंदाम, समीर उईके, रणवीर आत्राम आणि निखिल जुगनाके यांनी स्थान मिळवले आहे. या यशामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये आपली क्षमता सिद्ध करत उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पाऊल टाकले आहे. ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या यशासाठी छएडढड मुख्यालय, चढझडड नाशिक, अढउ नागपूर आणि प्रकल्प कार्यालय गडचिरोली यांच्या सहकार्याबद्दल शाळा प्रशासनाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.