वर्धा,
Inauguration of theater workshop नाट्यप्रतीक थिएटर अकॅडमीच्या वतीने आयोजित बहुप्रतीक्षित मस्तीची पाठशाळा या थिएटर वर्कशॉपचे उद्घाटन स्थानिक शिवसेना भवन येथे झाले. शिवसेनेचे लोकसभा संघटक रवी बालपांडे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश सराफ, उपजिल्हाप्रमुख मिलन गांधी, शहर प्रमुख शार्दुल वांदिले, तालुका प्रमुख वैभव तिजारे, महिला आघाडी प्रमुख मयुरी गांधी, आणि युवासेना जिल्हाध्यक्ष प्रथम यादव, ज्येष्ठ नाट्यकलावंत विकास फटिंगे, सुनील तितरे व मोहन सायंकार उपस्थित होते. यावेळी बालपांडे म्हणाले की, आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. मुलांच्या व्यतिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कलेची जोड असणे आवश्यक आहे. अभिनय हा केवळ पडद्यावर दिसण्यासाठी नसून, तो मुलांचा आत्मविश्वास आणि संवादकौशल्य वाढवण्यासाठी एक उत्तम माध्यम असल्याचे ते म्हणाले. संचालन दीपक नखाले यांनी केले. कार्यशाळेकरिता प्रशांत शिंदे, पूनम बोबडे, वैष्णवी नंदनवार, प्रिया मनमोडे, जान्हवी ठोंबरे, तुषार बोबडे, राहुल हेगडे आणि रोहित चाणक परिश्रम घेत आहेत.