वणी-घुग्गुस मार्गावर महामार्ग पोलिसांची अवैध वसुली ?

    दिनांक :11-May-2026
Total Views |
मनसेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

वणी, 
यवतमाळ जिल्ह्यातील Karanji Highway करंजी महामार्ग पोलिस चौकीतील कथित अवैध वसुली प्रकरणानंतर आता हीच पद्धत वणी-घुग्गुस राज्य महामार्गावर सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे वाहनधारक व चालक त्रस्त झाले असून, मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी 30 एप्रिल रोजी मुंबईच्या मुख्यमंत्री सचिवालयात याबाबत तक्रार दाखल केली आहे.
 
 
money
 
करंजी येथील वसुलीबाबत सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यानंतर वरिष्ठ अधिकाèयांनी कारवाई थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशांकडे दुर्लक्ष करून संबंधित महामार्ग पोलिसांनी आपला मोर्चा वणी-घुग्गुस मार्गावर वळविल्याचा आरोप करण्यात आला आहे. महामार्ग पोलिसांची मुख्य जबाबदारी अपघात नियंत्रण, वाहतूक शिस्त आणि प्रवाशांची सुरक्षा राखणे ही असताना, प्रत्यक्षात मात्र काही कर्मचारी अवैध वसुलीत गुंतल्याचे चित्र असल्याची टीका करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, वणी येथे स्वतंत्र वाहतूक पोलिस उपशाखा कार्यरत असूनही महामार्ग पोलिसांकडून स्थानिक हद्दीत हस्तक्षेप केला जात असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
 
Karanji Highway  याबाबत मनसे वाहतूक सेनेने तीव्र भूमिका घेत, जर महामार्ग पोलिसच सर्व कामकाज करणार असतील, तर स्थानिक वाहतूक शाखेचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित केला आहे. या प्रकारामुळे शासनाचा निधी व मनुष्यबळाचा अपव्यय होत असल्याची टीका मनसेने केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाèयांवर कडक कारवाई करावी, तसेच महामार्ग पोलिसांच्या कथित बेकायदेशीर हस्तक्षेपाला आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आता या प्रकरणावर गृहखात्याची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.