काठमांडू,
kathamandu plane crash काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना तुर्की एअरलाइन्सच्या विमानाच्या टायरला आग लागली. पोलिसांनीपुष्टी केली आहे की आग विझवण्यात आली असून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
विमानतळ सुरक्षा अधीक्षक राजकुमार सिलवाल म्हणाले, "तुर्की एअरलाइन्सचे विमान TK 726 इस्तंबूलहून काठमांडूला येत होते आणि उतरताना त्याच्या टायरला आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे."
विमानात २७८ प्रवासी होते
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विमानात एकूण २७८ प्रवासी आणि ११ कर्मचारी होते. प्रवाशांमध्ये संयुक्त राष्ट्रांचे काही अधिकारीही होते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ
सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका व्हिडिओमध्ये विमानाच्या उजव्या बाजूच्या लँडिंग गिअरला आग लागलेली आणि त्यातून धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत.kathamandu plane crash विमानातील प्रवाशांना आपत्कालीन दरवाजांमधून बाहेर काढण्यात आले. या घटनेबाबत विमानतळ किंवा विमान कंपनीकडून कोणतेही अधिकृत निवेदन किंवा घोषणा करण्यात आलेली नाही. घटनेचे कारण अद्याप अज्ञात आहे.