महाराष्ट्र सुवर्णरत्न पुरस्काराने लक्ष्मीकांत लोळगे सन्मानित

    दिनांक :11-May-2026
Total Views |
यवतमाळ, 
महाराष्ट्र सुवर्णकार संस्था व मासिक सुवर्णलंकारच्या वतीने नागपूर येथे देशव्यापी सोनार महोत्सव पार पडला. या महोत्सवात यवतमाळचे समाजसेवी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यतत्पर Laxmikant Lolge honored लक्ष्मीकांत घनश्याम लोळगे यांना महाराष्ट्र सुवर्णरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. ते सोनार सेवा महासंघाचे विदर्भ अध्यक्ष असून विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले आहेत. सर्वशाखीय सोनार समाजाचे एकत्रीकरण करून सामाजिक एकोपा निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
 
 
lakshami
 
सोबतच ओबीसी चळवळ, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यतत्परता याची दखल घेऊन सोनार महोत्सवात आयोजकांनी या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली. नागपूर येथे भव्य सोनार महोत्सवात शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांनी हा पुरस्कार समाजाला समर्पित केला. Laxmikant Lolge honored  लक्ष्मीकांत लोळगे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.