नागपूर,
Memorial Day celebrated स्वर्गीय बळवंतराव ढोबळे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांतून घडलेले सुसंस्कृत, शालीन आणि सभ्य व्यक्तिमत्त्व होते. जनसंघापासून भारतीय जनता पक्षापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास उल्लेखनीय राहिला. युती सरकारच्या काळात ते विधान परिषदेवर दणदणीत मताधिक्याने निवडून गेले होते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य पारदर्शक व जनहिताचे होते.
४ जुलै १९२५ रोजी जन्मलेल्या बळवंतराव ढोबळे यांचे ६ मे २०२४ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांची सर्व मुले उच्चशिक्षित असून, त्यांचे पुत्र मोरेश्वर ढोबळे हे सिव्हिल अभियंता तसेच शासकीय कंत्राटदार आहेत. Memorial Day celebrated वडिलांनी दिलेल्या सामाजिक बांधिलकीच्या संस्कारांचे पालन करत ते अनाथाश्रम, वृद्धाश्रम, वानप्रस्थ आश्रम तसेच शैक्षणिक संस्थांना सातत्याने आर्थिक मदत करत आहेत.
स्वर्गीय बळवंतराव ढोबळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त मोरेश्वर ढोबळे यांनी श्री उज्ज्वल गोरक्षण ट्रस्ट अंतर्गत बहादुरा, दिघोरी नाका, नागपूर येथील श्री महेश्वर वानप्रस्थ आश्रमात आश्रित, पुजारी आणि कर्मचाऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. त्यांच्या साध्या, विनम्र आणि आदरातिथ्यपूर्ण वागणुकीमुळे आश्रमातील अनेक ज्येष्ठ नागरिक भावूक झाले. Memorial Day celebrated काहींच्या डोळ्यांत अश्रूही तरळले. मोरेश्वर ढोबळे यांनी आश्रमातील ज्येष्ठांना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले.
या वानप्रस्थ आश्रमातील व्यवस्था अत्यंत उत्तम असून परिसरही विस्तीर्ण आहे. येथे भगवान श्रीकृष्णाचे सुंदर मंदिर आहे. दररोज दुपारी साडेबारा वाजता भगवानाच्या मूर्तीस नैवेद्य अर्पण केला जातो. Memorial Day celebrated त्यानंतर त्या ताटातील दोन चपात्या गोशाळेतील ४९३ गाईंमधील कोणत्याही दोन गाईंना खाऊ घातल्या जातात. श्लोक पठणानंतरच आश्रमातील रहिवासी भोजन ग्रहण करतात.
सौजन्य: गजेंद्र डोलके, संपर्क मित्र