शेगाव
Shegaon temple श्रीक्षेत्र शेगाव येथील गजानन महाराज मंदिराच्या परिसरातील पावित्र्य आणि शांतता अबाधित राखण्यासाठी तसेच भाविकांना शांत वातावरणात दर्शन घेता यावे यासाठी गजानन महाराज संस्थानने मंदिराच्या परिसरात मोबाईल वापरावर कडक निर्बंध लागू केले आहेत.
Shegaon temple शिस्त, शांतता आणि स्वच्छतेसाठी प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात दरदिवशी हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. अशावेळी मोबाईलवर बोलणे, फोटो आणि व्हिडीओ काढणे अशा प्रकारामुळे शांततामय आणि सुरळीत दर्शन व्यवस्थेवर परिणाम होतो. तसेच भाविकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे श्रींच्या दर्शनासाठी येणाèया भाविकांना मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारापासूनच आपला मोबाईल बंद ठेवावा लागणार आहे.
Shegaon temple मंदिर परिसरात कोणी भाविक मोबाईलचा वापर करताना आढळल्यास त्याच्याकडील मोबाईल तात्काळ संस्थानच्या कार्यालयात जमा केला जाणार आहे. ताब्यात घेतलेला मोबाईल परत मिळविण्याच्या प्रक्रियेत भाविकांचा वेळ वाया जाण्याबरोबर मानसिक त्रासही होऊ शकतो. हे टाळण्यासाठी भाविकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.