मुंबईतील मनी लाँड्रिंग प्रकरणाचे धागेदोरे वणीपर्यंत

    दिनांक :11-May-2026
Total Views |
मुंबई क्राईम ब्रँचचे विशेष पथक दाखल

वणी, 
Money laundering case मुंबईत गाजत असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणाचे धागेदोरे थेट वणीपर्यंत पोहोचल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई क्राईम ब्रँचचे विशेष पथक वणीत दाखल झाले असून संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वणी येथे एमडी ड्रग्ज प्रकरणात कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनू हा अद्याप फरार असून त्याचा मनी लाँड्रिंग व्यवहाराशी संबंध असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती आहे.
 
 
Money laundering
 
Money laundering case  तपासादरम्यान वणी परिसरातील आणखी दोन जणांचाही या व्यवहारात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगितले जात आहे. संबंधित तिघांच्या बँक खात्यांमध्ये लाखो रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या व्यवहारांचा सखोल तपास मुंबई पोलिस करत असून संशयितांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणात चौकशीसाठी दोन जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघेही नांदेपेरा गावातील रहिवासी असल्याचे समजते. या मनी लाँड्रिंग प्रकरणात वणी शहरातील आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही तपास मुंबई क्राईम ब्रँचकडून सुरू असून पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.