बीजिंग,
Trumps China visit confirmed अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी माहिती देताना सांगितले की, चीनचे राष्ट्राध्यक्ष Xi Jinping यांच्या निमंत्रणावरून ट्रम्प १३ ते १५ मेदरम्यान चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मध्यपूर्वेतील वाढता तणाव, इराणचा मुद्दा आणि अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे जगाचे लक्ष लागले आहे.

चीन दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांनी नेहमीच्या शैलीत विधान करताना, आपल्या आगमनानंतर शी जिनपिंग आपले उत्साहाने स्वागत करतील, असा दावा केला. मात्र, आंतरराष्ट्रीय घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांचे मत वेगळे आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार, सुरक्षा, तैवान, इराण आणि संरक्षण क्षेत्रांवरून वाढलेले मतभेद पाहता, दोन्ही नेत्यांची भेट औपचारिक आणि सावध वातावरणात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Trumps China visit confirmed काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी इराणला शस्त्रपुरवठा करणाऱ्या देशांवर कठोर भूमिका घेत मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावण्याची घोषणा केली होती. त्यावेळी चीनवरही अप्रत्यक्ष निशाणा साधण्यात आला होता. मात्र, नंतर ट्रम्प यांनीच सांगितले की, शी जिनपिंग यांनी इराणला शस्त्रे पुरवल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.
यापूर्वी ट्रम्प यांनी २०१७ मध्ये चीनचा दौरा केला होता. त्या वेळी चीनने अत्यंत भव्य स्वागत करत या भेटीला पारंपरिक राजनैतिक कार्यक्रमापेक्षा अधिक महत्त्व दिले होते. Trumps China visit confirmed यंदाची भेट सुरुवातीला मार्च अखेरीस होणार होती, मात्र मध्यपूर्वेतील संघर्षामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. याआधी दोन्ही नेत्यांची भेट दक्षिण कोरियातील बुसान येथे झालेल्या आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य परिषदेदरम्यान झाली होती.