पांढरकवडा विभागात 761 गावसमित्या स्थापन करणार

    दिनांक :11-May-2026
Total Views |
भारतीय किसान संघ राष्ट्रीय अध्यक्ष के. साई रेड्डी

पांढरकवडा, 
Pandharakawda : Bharatiya Kisan Sangh भारतीय किसान संघाच्या आगामी सदस्य अभियानांतर्गत पांढरकवडा विभागातील सर्व 761 गावांमध्ये ग्रामसमित्यांची स्थापना करून संघटन अधिक मजबूत केले जाईल, असा निर्धार भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष के. साई रेड्डी यांनी व्यक्त केला. पांढरकवडा येथे आयोजित 6 तालुक्यांच्या आढावा बैठकीत ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. राष्ट्रीय अध्यक्ष प्रथमच या भागात आले असल्याने पांढरकवडा विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या दौèयादरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष साई रेड्डी यांचे बुधवारी रात्री पांढरकवडा येथे आगमन झाले. तेथील समर्पण संघ कार्यालय येथे त्यांचा मुक्काम होता. त्यानंतर पुढील दिवशी, गुरुवार, 7 मे रोजी सकाळी त्यांनी केळापूर तालुक्याचे आराध्यदैवत जगदंबामातेचे दर्शन घेऊन बळीराजाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली.
 
 
sai
 
मुख्य बैठकीची सुरुवात रीतसर ध्वजारोहण आणि भगवान बलराम व भारतमाता यांच्या प्रतिमापूजनाने झाली. या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश समिती सदस्य पंडितराव वारंगे, विदर्भ प्रांताचे राम गायकवाड, तेलंगणचे भूमा रेड्डी आणि पांढरकवडा विभागाचे पालक तथा विदर्भ प्रांत युवा प्रमुख राम जिल्लडवार प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा घेण्यात आला. पांढरकवडा विभाग सदस्य नोंदणी अभियान प्रमुख म्हणून पंडितराव वारंगे यांची निवड करण्यात आली. वारंगे यांनी किसान संघाचे काम संघटनात्मक, रचनात्मक आणि आंदोलनात्मक पद्धतीने कसे चालते, याचे सविस्तर मार्गदर्शन कार्यकर्त्यांना केले. शेतकèयांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पांढरकवडा येथील धीरज धुधाळकर यांनी ‘मशरूम शेती’ या पूरक व्यवसायावर तांत्रिक माहिती दिली. तसेच, शेतकèयांचे स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाविरुद्ध ‘छोटी-छोटी आंदोलने’ प्रभावीपणे कशी हाताळावीत, याचे धोरणात्मक मार्गदर्शन तेलंगणचे भूमा रेड्डी यांनी केले.
 
 
 
Pandharakawda : Bharatiya Kisan Sangh  राष्ट्रीय अध्यक्ष के. साई रेड्डी पहिल्यांदाच पांढरकवडा विभागात आल्यामुळे विभागाचे पालक व विदर्भ प्रांत युवा प्रमुख राम जिल्लडवार, विदर्भ प्रांताचे राम गायकवाड आणि विजय धानोरकर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा भावपूर्ण सत्कार केला. यासोबतच संगम सावंगी आणि सगदा ग्राम समितीच्या वतीनेही राष्ट्रीय अध्यक्षांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्याला पीक विमा योजनेचा लाभ मिळाला नसल्याबद्दल बैठकीत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. शासनाने आधी जाहीर केलेली हेक्टरी 17,000 रुपये मदत शेतकèयांना त्वरित मिळावी आणि पीक विम्याची भरपाई मिळावी, या मागणीसाठी बैठकीनंतर सर्व शेतकरी व पदाधिकाèयांनी विभागीय कार्यालयावर धडक देऊन प्रशासनाला निवेदन सादर केले. बैठकीचे सूत्रसंचालन प्रशांत झिलपे यांनी केले, तर आभार विजय धानोरकर यांनी मानले. सामूहिक पसायदानाने बैठकीची सांगता झाली. या बैठकीला विभागातील मान्यवर शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.