‘गीतरामायण’ लिहिलेल्या वास्तूत ‘महाभारत’

गदिमांच्या ‘पंचवटी’ला पाडण्याचा दबाव

    दिनांक :11-May-2026
Total Views |
पुणे
Gadima महाराष्ट्रातील प्रत्येक सुजाण कुटुंबात गदिमांचे ‘गीतरामायण’ ख्यात आहे. ज्या ठिकाणी अजरामर गीतरामायण लिहिले गेले ती वास्तू जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. गदिमांच्या पुण्यातील ‘पंचवटी’ या बंगल्यावरून मोठा वाद समोर आला आहे.
गदिमांचे नातू सुमित्र यांनी समाज माध्यमांद्वारे ही माहिती दिली आहे. सुमित्र श्रीधर माडगूळकर यांनी पोस्टमध्ये गदिमांची पवित्र वास्तू ‘पंचवटी’ पाडण्यास विरोध केला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला दोका आहे. तसेच त्यांची खोटी बदनामी केली जात असल्याचेही सुमित्र यांनी सांगितले.
gadima house
 
Gadima सुमित्र यांनी लिहिले आहे की, गदिमांनी हयात असताना म्हटले होते की जोपर्यंत माझे घर पंचवटी आहे तोपर्यंत माझे अस्तित्व या जगात राहील. गदिमांची पवित्र वास्तू पाडावी किंवा बिल्डरला विकावी, असा दबाव आमच्या घरातील अगदी जवळच्या नातेवाईकांकडून आणला जात आहे. ज्यांनी गदिमांवर मोठी पुस्तके लिहिली ते या कटात सामील आहेत. केवळ लोकांना दाखवायला ते गदिमांचा वारसा सांगतात पण प्रत्यक्षात त्यांचे पंचवटी पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Gadima गेले काही महिने माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याला मी माझ्या जीवात जीव असेपर्यंत विरोध करतो आहे, पुढेही करणार आहे. केवळ पैशांसाठी गदिमांची वास्तू पाडणे योग्य नाही. ज्या पवित्र वास्तूत गीतरामायण लिहिले गेले ती अनेक साहित्यिक कलाकृतींची साक्षीदार आहे. गदिमांच्या सहवासाचा गंध या वास्तूत दरवळतो आहे, असेही सुमित्र लिहितात.