मुंबई,
Raja Shivaji is racing at box office 'राजा शिवाजी' हा ऐतिहासिक मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत असून प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळवत आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दहाव्या दिवसापर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ७५ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, जेनेलिया डिसूझा आणि विद्या बालन यांसारख्या कलाकारांनी सजलेल्या या चित्रपटाने पहिल्या आठवड्यापासूनच दमदार कामगिरी केली. दुसऱ्या वीकेंडमध्येही चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले.

चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ५७.७० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर आठव्या दिवशी ३.५० कोटी, नवव्या दिवशी ६.३० कोटी आणि दहाव्या दिवशी ७.६० कोटी रुपयांची कमाई झाली. अशाप्रकारे चित्रपटाची एकूण देशांतर्गत निव्वळ कमाई ७५.१० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. जागतिक बॉक्स ऑफिसवरही ‘राजा शिवाजी’ची दमदार घोडदौड सुरू असून चित्रपटाने ८१ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. महाराष्ट्रासह देशभरातील प्रेक्षकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कुटुंबीयांची मोठी उपस्थिती यामुळे चित्रपटाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.