स्नेहा टोम्पे यांना डॉक्टरेट

    दिनांक :11-May-2026
Total Views |
यवतमाळ :
जलसंपदा विभाग या कार्यालयातील आरेखक Sneha Tompe स्नेहा टोम्पे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने मराठी विषयात आचार्य (पीएचडी) पदवीने सन्मानित करण्यात आले. त्यांनी अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालयातील प्रा. डॉ. सुवर्णा गाडगे यांच्या मार्गदर्शनात ‘अशोक राणा यांच्या साहित्यातील मातृदेवतांचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला.
 
 
Sneha Tompe
 
Sneha Tompe  त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये 4 शोधनिबंध सादर केले असून ‘मातृदेवता व मिथके’ या विषयावर व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या या यशाचे श्रेय मार्गदर्शक प्रा. डॉ. सुवर्णा गाडगे, डॉ. अशोक राणा, पती डॉ. सूरज लांडगे, आई-वडील, सासू-सासरे व परिवारातील सदस्यांना दिले. या संशोधन कार्याबद्दल स्नेहा टोम्पे यांचे शिक्षण व साहित्य क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.