चेन्नई,
Vijay Sarkars तामिळनाडूमध्ये महिलांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी मुख्यमंत्री C. Joseph Vijay यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात महिलांवरील गुन्हे आणि अमली पदार्थांच्या वाढत्या जाळ्याला आळा घालण्यासाठी ‘सिंगापेन सिरुंबू’ नावाचे विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत विजय यांनी ही महत्त्वाची घोषणा केली.

राज्य पोलीस विभागाने मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार या विशेष पथकाच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू केली आहे. महिलांशी संबंधित तक्रारींवर तातडीने कारवाई करणे, अमली पदार्थांच्या तस्करीवर कठोर नियंत्रण ठेवणे आणि महिला तसेच तरुणींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे, ही या पथकाची मुख्य जबाबदारी असेल. Vijay Sarkars या पथकात मोठ्या प्रमाणात महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून, त्यांना विशेष अधिकारही देण्यात आले आहेत. महिलांविरोधातील लैंगिक गुन्हे रोखण्यासाठी आणि गुन्हेगारांविरोधात जलद कारवाई करण्यासाठी हे पथक राज्यभर सक्रिय राहणार आहे. तसेच शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी जाऊन महिलांच्या सुरक्षेबाबत जनजागृती मोहीमही राबवली जाणार आहे.
मुख्यमंत्री विजय यांनी निवडणुकीदरम्यान महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हे विशेष पथक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय मंजुरीनंतर पोलीस महासंचालकांकडून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. Vijay Sarkars ‘सिंगापेन सिरुंबू’ या नावालाही विशेष अर्थ आहे. तमिळ भाषेत ‘सिंगापेन’ म्हणजे सिंहिण, तर ‘सिरुंबू’ म्हणजे मुंगी. आकाराने लहान असले तरी ताकद आणि प्रभाव मोठा असतो, असा संदेश या नावातून देण्यात आला आहे.