विजयच्या ‘जना नायकन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

    दिनांक :11-May-2026
Total Views |
चेन्नई,
Vijay's movies Jana Nayakkan तामिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री विजय यांचा बहुचर्चित आणि शेवटचा चित्रपट जना नायकन प्रेक्षकांच्या भेटीला येण्याच्या मार्गावर आहे. गेल्या काही महिन्यांपासून सीबीएफसी प्रमाणपत्राच्या प्रक्रियेमुळे चित्रपटाचे प्रदर्शन रखडले होते. मात्र आता निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीजबाबत मोठी माहिती दिली आहे. चित्रपटाचे निर्माता व्यंकट के. नारायण यांनी चेन्नईमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘जना नायकन’ पुढील दोन आठवड्यांत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊ शकतो. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळासोबत चर्चेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून चित्रपटाला मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
jana nayagan
 
दिग्दर्शक एच. विनोथ यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. प्रमाणपत्र प्रक्रियेसोबतच ऑनलाइन लीकच्या वादामुळेही चित्रपटाची चर्चा रंगली होती. तरीही आता संपूर्ण टीम चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज असल्याचे निर्मात्यांनी सांगितले. व्यंकट के. नारायण यांनी विजय यांच्या कामाप्रती असलेल्या शिस्तीचे आणि समर्पणाचे विशेष कौतुक केले. अभिनेता आणि राजकारणी या दोन्ही भूमिकांमध्ये विजय यांनी दिलेले शब्द नेहमी पाळले, असे ते म्हणाले. ‘जना नायकन’ हे शीर्षक तामिळनाडूमध्ये विजय यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या नव्या राजकीय पर्वाचे प्रतीक असल्याचेही त्यांनी नमूद केले.