वर्षभर सोने खरेदी करू नका.....

पंतप्रधानांनी केलेली नऊ आवाहने कोणती?

    दिनांक :11-May-2026
Total Views |
हैदराबाद
Prime Minister appeals पंतप्रधानांनी आज देशवासियांना नऊ महत्वाची आवाहने केली आहेत. तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे९३७७ कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
 

pm modi 
Prime Minister appeals पेट्रोल, डिझेल आणि गॅस यांसारख्या वस्तूंचा वापर गरजेनुसार करणे ही काळाची गरज आहे. आपण आयात केलेल्या पेट्रोलियम उत्पादनांचा वापर केवळ गरजेनुसारच केला पाहिजे. यामुळे केवळ परकीय चलनच वाचणार नाही, तर युद्धाचे दुष्परिणामही कमी होतील असे ते म्हणाले.
Prime Minister appeals नरेंद्र मोदी यांची देशवासियांना उद्देशून केलेली नऊ आवाहने
1 पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा कारण दर खूप वाढले आहेत
2 खाद्यतेलाचा वापर मर्यादित जपून करा
3 पुढील एक वर्ष सोनं खरेदी करू नका
4 वर्षभर परदेशी प्रवास टाळा
5 कच्च तेल वाचवण्यावर भर द्यायचा आहे
6 परकीय चलन वाचवण्यावर भर द्यायचा आहे, परकीय चलन साठा आपल्याला कमी होऊ द्यायचा नाही
7 जास्तीत जास्त मेट्रोने प्रवास करा, इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करा
8 वर्क फ्रॉम होम वर भर द्या, ऑनलाईन बैठकांवर भर द्या
9 परकीय उत्पादनांची खरेदी कमी करा