पीकविमा संदर्भातील अपप्रचार राजकीय हेतूने प्रेरित

    दिनांक :12-May-2026
Total Views |
शेतकऱ्यांनी संयम ठेवावा आ. भीमराव केराम

श्रीक्षेत्र माहूर, 
तालुक्यातील शेतकèयांना पीकविम्याचा लाभ मिळाला नसल्याबाबत समाज माध्यमांवर मुद्दाम पसरवल्या जाणाèया वावड्या या राजकीय उद्देशाने प्रेरित असल्याचे ठाम मत व Bhimrao Keram आमदार भीमराव केराम यांनी व्यक्त केले. स्थानिक जगदंबा धर्मशाळा सभागृहात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिराच्या समारोपात ते बोलत होते. यावेळी तहसीलदार अभिजित जगताप, नगर पंचायत अध्यक्ष फिरोज दोसाणी, मुख्याधिकारी विवेक कांदे, नायब तहसीलदार अरुणा सूर्यवंशी, पोलिस ठाणेदार देविदास चोपडे, सहायक गटविकास अधिकारी मुरादे, नगरसेवक गोपू महामुने, अनिल वाघमारे व्यासपीठावर उपस्थित होते.
 
 
keram
 
Bhimrao Keram  आ. केराम पुढे म्हणाले, तालुका प्रशासनाच्या वतीने नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. माहूर तालुक्यातील विमाधारक शेतकèयांना पीकविमा परतावा मिळवून देण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्नरत असून काही तांत्रिक अडचणी दूर होताच शेतकèयांच्या खात्यात पीकविम्याची रक्कम जमा होईल. त्यामुळे शेतकèयांनी अफवांवर विश्वास न ठेवता थोडा संयम बाळगावा. प्रास्ताविकात तहसीलदार अभिजित जगताप यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार जावे लागू नये आणि सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन उपकृषी अधिकारी गणपत सूर्यवंशी यांनी केले. तर ग्राम महसूल अधिकारी चंद्रकांत बाबर यांनी आभार मानले.