नागपूर,
Bajiprabhu Nagar, Nagpur पश्चिम नागपुरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या बाजीप्रभुनगर परिसरात रस्तोरस्ती फिरणाऱ्या डुकरांच्या कळपामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरात सर्वत्र घाण पसरत असून दुर्गंधीमुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, शेजारील वस्तीत राहणाऱ्या काही व्यक्तींची ही डुकरे असून त्यांच्याकडून दादागिरी केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. Bajiprabhu Nagar, Nagpur त्यामुळे संबंधित प्रशासनालाही कारवाई करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे.नागरिकांनी महानगरपालिका व संबंधित विभागाकडे तातडीने डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. वेळेत दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही रहिवाशांनी दिला आहे.
सौजन्य:रवि वाघमारे ,संपर्क मित्र