नवी दिल्ली,
China is hoarding fertilizers अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे जगभरात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, विस्कळीत झालेली पुरवठा व्यवस्था आणि खतांच्या तुटवड्यामुळे अनेक देश चिंतेत असतानाच चीनबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जागतिक बँकेचे माजी अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी दावा केला आहे की, चीन मोठ्या प्रमाणावर धान्य आणि खतांचा साठा वाढवत असून यामुळे भविष्यात जागतिक संकट अधिक तीव्र होऊ शकते.
एका वृतानुसार मालपास यांनी सांगितले की, चीनकडे आधीपासूनच जगातील सर्वात मोठा धान्य आणि खतसाठा आहे आणि तो आणखी वाढवला जात आहे. China is hoarding fertilizers त्यांच्या मते, जागतिक पुरवठा साखळीवरील ताण कमी करण्यासाठी चीनने ही साठेबाजी थांबवणे आवश्यक आहे. मार्च महिन्यापासून चीनने खतांच्या निर्यातीवर निर्बंध आणल्याने अनेक कृषीप्रधान देशांमध्ये चिंता वाढली आहे.
याचा थेट परिणाम भारतासारख्या देशांवर होताना दिसत आहे. भारत मोठ्या प्रमाणावर परदेशातून खतांची आयात करतो. विशेषतः युरिया आणि डीएपीसारख्या खतांसाठी भारत बाह्य बाजारावर अवलंबून आहे. युद्धामुळे वाहतूक मार्गांवर परिणाम झाल्याने आणि चीनच्या धोरणामुळे खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. China is hoarding fertilizers काही महिन्यांपूर्वी तुलनेने कमी दरात मिळणारे युरिया आता जवळपास दुप्पट किमतीत खरेदी करावे लागत असल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, चीनचा हा निर्णय केवळ सुरक्षेच्या कारणांसाठी नाही, तर दीर्घकालीन आर्थिक आणि राजकीय रणनीतीचाही भाग असू शकतो. होर्मुझ सामुद्रधुनीत निर्माण झालेल्या तणावामुळे जागतिक जलवाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे भविष्यात अन्नधान्य आणि खतांच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होण्याची भीती चीनला वाटत असल्याचे मानले जात आहे. त्याचवेळी मोठा साठा ठेवून जागतिक बाजारात प्रभाव वाढवण्याचाही प्रयत्न असल्याची चर्चा सुरू आहे. China is hoarding fertilizers भारतासाठी ही परिस्थिती धोक्याची घंटा मानली जात आहे. खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतीचा खर्च वाढेल आणि त्याचा परिणाम थेट अन्नधान्याच्या दरांवर होऊ शकतो. आधीच इंधन दरवाढीचा सामना करणाऱ्या भारतासमोर आता शेती आणि महागाईचे नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.