वर्धेत विज्ञान संस्कार शिबिर यशस्वी

    दिनांक :12-May-2026
Total Views |

midud
 
वर्धा, 
cience Values ​​Camp in Wardha विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ नागपूर शाखा वर्धा व स्कूल ऑफ स्कॉलर्स सावंगी मेघे यांच्या संयुत वतीने या सात दिवशीय विज्ञान संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण शोधून त्यांना विज्ञानाची आवड विविध छोट्या-छोट्या प्रयोगातून व्हावी व त्यांचे नवीन शैक्षणिक धोरणानुसार ३६० अंशाचे मूल्यमापन व्हावे हा उद्देश ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात वर्धेतील दहा ते बारा (सीबीएससी व स्टेट) शाळेतील जवळपास शंभर विद्यार्थ्यांचा सहभाग होता.विद्यार्थी दीड तास अभ्यासक्रमातील नावीन्यपूर्ण प्रयोग स्वतः करून काहीतरी नवीन शिकण्याचा अनुभव घेत होते. सोबतच भारतीय वैज्ञानिकांचे योगदान, स्पेस सायंटिस्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन् व आयुर्वेद आदी विविध विषयांवर एक तासाचे नावीन्यपूर्ण उद्बोधन होत होते.शिबिराच्या समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर येथील येथील प्राध्यापक डॉ. सुरेखा कालकर, डॉ. सरोज देसाई, वसुंधरा साठे, तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल व्यास, एसओएसचे प्राचार्य सुरेश लकडे, शिबिराचे संयोजक विनय मुलकलवार, मुख्याध्यापक मंजिरी रासपायले उपस्थित होते. कालकर यांनी विद्यार्थ्यांना अतिशय साध्या शब्दात विज्ञानाचे महत्त्व व यातील नवनवीन संशोधन याबद्दल मार्गदर्शन केले. काही विद्यार्थांनी शिबिराबद्दल अप्रतिम प्रतिक्रिया दिल्या.