समाजाची उदासीनता भ्रष्टाचाराला पोषक

    दिनांक :12-May-2026
Total Views |
वेध  
चंद्रकांत लोहाणा
Corruption भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड असून जनतेच्या सहभागाविना भ्रष्टाचाराचा हा राक्षस समाजामधून हद्दपार होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. आजमितीस भ्रष्टाचार हा शिष्टाचार समजला जात असला, तरी भविष्यामध्ये देश आणि समाजावर त्याच्या होणार्‍या घातक परिणामाची चिंता व चिंतन करताना कोणीच दिसून येत नाही. समाजामध्ये असलेली कमालीची उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भ्रष्टाचार करणार्‍यांचे सहज फावते आणि ही मालिका अविरत सुरू राहते. भ्रष्टाचारामुळे देश पोखरला गेला आहे. तो सहन न करण्याचे व त्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे धोरण आहे. सुरुवातीपासूनच हा विषय नरेंद्र मोदी त्यास प्राथमिकता देऊन प्राधान्याने आहे. देशाला व सामान्य जनतेला लुटणार्‍या भ्रष्ट लोकांना कदापिही सोडले जाणार नाही, या धोरणास त्यांनी प्राथमिकता देऊन हा लढा अधिक तीव्र केला आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना मोदींच्या मनातील तळमळ अनेकदा देशवासीयांनी अनुभवली आहे. अनेकदा याबाबत त्यांनी देशवासीयांसमोर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. त्यामुळे या लढाईमध्ये देशामधील सामान्य जनतेचे सहकार्यही त्यांना आहे.
 

VEDHPH 
 
Corruption  सामान्य जनतेच्या सहकार्याविना हा लढा जिंकणे अशक्य असल्याने त्यांच्या या लढ्यामध्ये प्रत्येकाने आपला सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. भ्रष्टाचाराची सुरुवात समाजाच्या मूकसंमतीनेच होत असते, हे उघड आहे. त्यामुळे भ्रष्टाचार करणार्‍यांचे चांगलेच फावते. यापुढे आपल्या आयुष्यामध्ये भ्रष्टाचाराला थाराच देणार नाही, असा ठाम निर्धार करून अशी शपथ जर प्रत्येकाने घेतली तर लढ्याला अधिक बळ मिळून देशाची वाटचाल एक भ्रष्टाचारमुक्त देश म्हणून सहज होऊ शकते. जनतेच्या सहकार्यानेच या लढ्याला यश मिळू शकते. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढताना पंतप्रधानांनी कोणाचीही तमा न बाळगता व विरोधकांच्या हल्ल्याची पर्वा न करता हा लढा निर्धारपूर्वक सुरू ठेवला आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत हे त्यांचे स्वप्न आहे. नरेंद्र मोदी यांच्या पाऊल ठेवून राज्य शासनानेही भ्रष्टाचार विरोधातील लढ्यास गती देणे आवश्यक आहे.
 
 
Corruption हा लढा लढण्यास सहज आणि सोपा नाही, याची जाणीव सर्वांनाच आहे. या लढ्यामध्ये स्वकीयांशीच दोन हात करावे लागणार आहे. त्यासाठी तारेवरची कसरत करून पुढे जावे लागणार आहे. ही वाट अतिशय बिकट आहे. याची जाणीव असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी तमा न बाळगता गोरगरिबांच्या हितासाठी अधिक तीव्रतेने हा लढा पुढे रेटत आहेत. कोणतेही शासकीय काम सहजासहजी होत नाही, हा आजवरचा नागरिकांचा अनुभव आहे. ग्रामीण भागातील तळहातावर पोट घेऊन जगणार्‍या व रोजमजुरीवर काम करून जगणार्‍या गरिबांना शासकीय कार्यालयाचे उंबरठे रोज झिजविणे परवडणारे नसते. एखाद्या लहानशा कामासाठी रोजमजुरी पाडून दिवसभर कार्यालयामध्ये बसणे हे त्यांच्या कुटुंबासाठी उपासमारीचे कारण ठरू शकते. गोरगरिबांची नेमकी हीच असहायता हेरली जाते आणि नकळत असे गोरगरीब भ्रष्टाचाराच्या आहारी जातात. त्यांच्यापुढे पर्यायच उपलब्ध नसतो. त्यामुळे आज भ्रष्टाचारास शिष्टाचाराचे स्वरूप प्राप्त झाल्याचे बघावयास मिळत आहे. पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आपली दिशा स्पष्टपणे ठरविली आहे. त्यांच्या जवळपास ११ वर्षांच्या कारकीर्दीमध्ये घोटाळा न घडणे, हे त्यांच्या यशाचे आणि ठाम निर्धाराचे श्रेय आहे. या देशाने यापूर्वी अनेक घोटाळ्यांची मालिका अनुभवली आहे. त्यामुळे आपल्या देशामध्ये काळ्या पैशाची एक समांतर मालिका उभी राहिली होती. मोदींच्या या ठाम निर्धाराने देशामधील अनेक बडे राजकारणी मोदींच्या या अस्त्राने घायाळ झाले असून आपली वर्षानुवर्षे चालणारी दुकानदारी बंद ते सध्या चवताळले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वाट्टेल ते आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येत आहे. विरोधकांची ही दुटप्पी चाल जनताही ओळखून आहे. त्यामुळे मोदी विरोधकांचे धाबे दणाणले आहेत, एवढे मात्र नक्की. 
 
९८८१७१७८५६