वाढत्या उष्णतेमुळे दूध उत्पादनात लक्षणीय घट

हिरवा चारा मिळेना, पशू खाद्यही महागले!

    दिनांक :12-May-2026
Total Views |
सिंदी (रेल्वे), 
Decrease in milk production due to heat अलीकडे तीव्र उष्णतामान असल्यामुळे दुग्ध उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. उन्हामुळे हिरवा चारा मिळत नसल्यामुळे जनावरांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होताना दिसत आहे. परिणामी, दुधाच्या उत्पादनात २५ टके घट आली असल्याचे येथील दूध डेअरी चालकांनी सांगितले. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. जनावरांना भरपूर हिरवा चारा मिळणे कठीण झाले. वाढत्या उष्णतेमुळे जनावरांची भूक मंदावते, त्यामुळे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी, दुधाचे उत्पादन कमी झाले, असे गोपालकांचे म्हणणे आहे. उष्णतेचा ताण वाढल्यास गाई-म्हशींच्या दुधामध्ये २५ टयाची घट येत असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी सांगतात. उष्णतेमुळे दूध फाटण्याचे किंवा खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे, ते वेगळेच. उष्णतेमुळे जनावरांचे आरोग्य व प्रजनन समस्या अधिक प्रमाणात जाणवत असते. याकाळात जनावरांची रोगप्रतिकारशती कमी होते आणि जनावर आजारी पडण्याची दाट शयता असते. वाढत्या उष्णतापमानामुळे हिरवा चारा मिळत नसल्याने जनावरांना वाळलेला चारा खावा लागतो. त्यामुळे दूध उत्पादनावर थेट परिणाम होतो.
 
 
 
Decrease in milk
 
वाढत्या तापमानामुळे दुधाच्या उत्पादनात घट आली असून चारा आणि पशुखाद्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या लग्नसराई आणि उन्हाळ्याच्या पृष्ठभूमीवर आईस्क्रीम, लस्सी, ताक, पनीर, बटर आणि दुधाच्या पावडरलाही अधिक मागणी आहे. असे असतानाही शेतकर्‍याच्या दुधाला पुरेसा भाव मिळत नाही. उन्हामुळे दुधात घट, चारा आणि पशुखाद्याच्या किमतीत झालेली वाढ, मात्र दुधाचे दर वाढले नसल्यामुळे गो-पालक शेतकरी दुहेरी कोंडीत सापडला आहे. यंदा दरवर्षीच्या तुलनेत १५ दिवस आधीच उन्हाचे चटके वाढल्यामुळे चारा टंचाई भासू लागली आहे. सध्या दुधाचे भाव ३३ रुपये प्रति लिटर असून दूध उत्पादनात घट आल्याचे येथील दूध डेअरी चालक संदीप मुडे यांचे म्हणणे आहे. सध्या मिळणारा दर आणि उत्पादनावर होणारा खर्च पाहता दुधाचा व्यवसाय प्रचंड अडचणीत असताना सरकारी पातळीवर मात्र याबाबत गांभीर्याने विचार केला जात नसल्याची खंत शेतकर्‍यांनी व्यत केली. दुग्ध व्यवसाय अडचणीत असताना शेतकरी नेतेही दुग्ध व्यवसायाबाबत गप्प असल्याचे दूध उत्पादकांचे म्हणणे आहे. यंदा तीव्र उष्णतेमुळे चार्‍याचे दर वाढले. शिवाय पशुखाद्याचेही भाव वाढले. उन्हामुळे दूध उत्पादनात घट आली. पशुखाद्याचे दर वाढले असताना त्या तुलनेत दुधाचे भाव वाढले नाहीत. त्यामुळे दुग्ध व्यवसायिक अडचणीत आले असल्याची प्रतिक्रीया गोपालक चंद्रशेखर बेलखोडे यांनी व्यत केली.