नागपूर,
Deendayal Research Institute Baljagat दीनदयाल शोध संस्थानच्या बालजगत येथे आयोजित उन्हाळी शिबिरातील बालरंजन व शिशुरंजन शिबिरामध्ये सोमवार, ११ मे २०२६ रोजी मातृदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून बालजगतच्या मार्गदर्शिका मीरा खडक्कार उपस्थित होत्या.यावेळी मुलांनी आपल्या आईचे औक्षण करून ग्रीटिंग कार्ड देत मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या. बालरंजन शिबिरातील विद्यार्थिनी शांभवी ढवळे हिने आईचे महत्त्व विषद केले, तर सिधीक्षा सोनक हिने आईवरील कविता सादर केली. अनिशा केंभवी हिने आईवरील सुंदर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
प्रमुख पाहुण्या मीरा खडक्कार यांनी मुलांना प्रेरणादायी गोष्ट सांगत, रोज सकाळी उठल्यानंतर “आई तुझे थोर उपकार” असे म्हणण्याचा संदेश दिला.Deendayal Research Institute Baljagat तसेच सर्व पालकांना मातृदिनाच्या शुभेच्छाही दिल्या. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन अदिती जोशी यांनी केले.यांनी केले. यावेळी प्रकल्प प्रमुख अनुजा परचुरे, अध्यक्ष अभिनंदन पळसापुरे, उत्तरा नवरे,संयोजिका व बालजगत कार्यकर्ते उपस्थित होते.
सौजन्य:सायली जतकर,संपर्क मित्र