बाप की कसाई? मुलीची आत्महत्या; निधनानंतर बापाने वाजवल्या टाळ्या!

    दिनांक :12-May-2026
Total Views |
मुंबई,
girl-commits-suicide : वडिलांच्या सततच्या मानसिक जाचाला कंटाळून नवी मुंबईतील 'निफ्ट' (NIFT) मध्ये शिक्षण घेणाऱ्या स्वप्नाली घेवारी या २४ वर्षीय तरुणीने वरळी येथे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. स्वप्नाली पुण्याच्या खडकी पिंपळगावची रहिवासी असून शिक्षणासाठी ती वरळीत भाड्याने राहत होती. तिचे वडील सुनील घेवारी यांना दारूचे व्यसन असल्याने घरात नेहमीच भांडणे होत असत, ज्याला कंटाळून स्वप्नालीची आई देखील तिच्याकडे राहण्यासाठी आली होती.
 
 

suicide 
 
 
घटनेच्या दिवशी सुनील यांनी स्वप्नालीला फोन करून आईबद्दल विचारणा करत प्रचंड मानसिक त्रास दिला. वडिलांशी झालेल्या मोठ्या वादानंतर वैतागलेल्या स्वप्नालीने अखेर गळफास लावून आपले जीवन संपवले. धक्कादायक बाब म्हणजे, मुलीच्या निधनानंतर वडिलांनी शोक व्यक्त करण्याऐवजी पत्नीच्या माहेरी जाऊन टाळ्या वाजवत मुलीच्या मृत्यूचा आनंद साजरा केला आणि पत्नीलाही जीवे मारण्याची धमकी दिली. या अघोरी प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून वरळी पोलिसांनी आरोपी वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.